जालना । वार्ताहर

मातोश्री स्व.भुदेवी किसनराव गोरंटयाल अन्न छत्राच्या माध्यमातून गरीब व कष्टकर्‍यांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवून गरजू लोकांची भूक भागविण्यासाठी चालवलेला उपक्रम कोतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेशभय्या टोपे यांनी येथे बोलतांना केले. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासनाने प्रथम राज्यात संचारबंदी लागू केली होती.राज्य शासनाच्या या निर्णया पाठोपाठ केंद्र सरकारने देखील देशभरात लॉकडाऊनचे आदेश जारी केल्यामुळे उद्योग, व्यवसाय,कारखानदारी,अगदी छोटे मोठे व्यवसाय बंद करण्यात आले. परिणामी यासर्व व्यवसायांवर अवलंबून असलेला कामगार,मजूर, गोरगरीब,आणि कष्टकर्‍यांची आर्थिक अवस्था बिकट होऊन जालना शहरातील हजारो कुटुंब आणि या कुटुंबातील सदस्यांच्या दररोजच्या अन्न पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेऊन जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल आणि नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल या दाम्पत्याने जालना शहरातील गरीब व कष्टकर्‍यांच्या मदतीला धावून जात प्रारंभी जालना शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून पोळी भाजी, पुरी भाजी, खिचडी पुलाव वाटप करून त्यांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दि 9 एप्रिल रोजी असलेला वाढदिवस साजरा न करता कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आ.कैलास गोरंटयाल यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि सहकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जालना शहरातील सुमारे 25 हजारपेक्षा अधिक गरजू कुटुंबाना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून मदतीचा उपक्रम राबविला. 

संचारबंदी सह दोनवेळा लॉकडाऊन वाढविल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने जालन्याचे आ.कैलास गोरंटयाल आणि नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल या दाम्पत्याने गोरगरीब व कष्टकरी लोकांच्या अन्न पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आपल्या मातोश्री स्व.श्रीमती भुदेवी गोरंटयाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ जालना शहरात आठ दिवसापूर्वीच अन्न छत्राचा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील मंगलबाजार भागात असलेल्या मोतीबंगला येथे सुरू करण्यात आलेल्या या अन्नछत्राच्या उपक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेशभय्या टोपे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार कैलास गोरंटयाल यांनी पालकमंत्री श्री टोपे यांना या उपक्रमाविषयी विस्तृत माहिती देऊन शहरातील जवळपास तीन ते चार हजार गरजूंना पाकिटबंद अन्न घरपोच पुरवठा केले जात असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री श्री राजेशभय्या टोपे यांनी याउपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की,जालना शहरातील सामाजिक कार्यात गोरंटयाल परिवाराने सातत्याने पुढाकार घेतला आहे. उदोजक स्व.किशनराव गोरंटयाल, स्व.श्रीमती भुदेवी गोरंटयाल यांनी गोरगरिबांना नेहमीच मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन आ.कैलास गोरंटयाल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांनी सामाजिक कार्याचा हा वारसा जपला असून आज कोरोना सारख्या संकटाच्या कठीण परिस्थितीत नातेवाईक एकमेकांपासून दूर होत असतानाही गोरंटयाल दाम्पत्याने मात्र स्व.भुदेवी गोरंटयाल अन्न छत्राच्या माध्यमातून जालना शहरातील प्रत्येक भागात गरजू व्यक्तींपर्यंत अन्नाचे पाकीट पोहचवून दररोज गरजूंची भूक भागविण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत कोतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे उदगार पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी काढले.लॉकडाऊन संपेपर्यंत शहरातील इतर सामाजिक संघटना, त्यांचे सर्व पदाधिकारी, व्यापारी,उद्दोजकांनी अशा पध्दतीने अन्नछत्र सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा देखील श्री टोपे यांनी व्यक्त केली. यावेळी राम सावंत, शहराध्यक्ष शेख महेमुद, नगरसेवक रमेश गौरक्षक, संजय भगत, हरिष देवावाले,विनोद यादव,योगेश पाटील, योगेश भोरे, अरुण घडलिंग, गोपाल चित्राल, गणेश चौधरी, दीपक जाधव, सोनू सामलेटी, पांडुरंग शिंदे, शंकर साळवे, संतोष चांदणे, मंगल मापारे, राजू घाटेकर, किरण सगट, समाधान शेजुळआदींची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.