जालना । वार्ताहर
भारतीय जैन संघटना सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे जालना तालुका भाजपाचे मा.अध्यक्ष तथा जालना तालुका रो.ह.यो,चे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी असे गौरव उदगार सेवली येथे आरोग्य तपासणी दरम्यान काढले, भारतीय जैन संघटनेच्यावतीने नैसर्गिक आपत्ती,भुकंप,दुष्काळ व ईतर संकटाच्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात धाऊन जाऊन आर्थिक मदत करण्याचे काम अविरत चालु असल्याचे ज्ञानेश्वर शेजुळ यांनी म्हटले आहे व या संघटनेच्यावतीने सध्या सेवली सर्कलमध्ये डॉक्टर आपल्यादारी.हा ऊपक्रम राबविण्यात येत आहे.
काल भारतीय जैन संघटना,ङ्गोर्स मोटार्स व डॉक्टर युनियनच्यावतीने जालना तालुक्यातील मौजे सोनदेव येथे कोरोना विषाणुवर मात करण्यासाठी गावात आरोग्य तपासणी करण्यात आली. गावातील अनेक रुग्णांना तपासण्यात आले व काहींना योग्य प्रमाणात गोळ्या व औषधी वाटप करण्यात आली.या वैद्यकिय पथकामध्ये सेवली येथील जैन संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश शेठ राका, जालना तालुका भा.ज.पा.चे मा.अध्यक्ष व रो.ह.यो.चे अध्यक्ष ज्ञानेश्वर शेजुळ,सेवली प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी,मॅडम,डॉ.मान्टे साहेब, डॉ.नागरे साहेब,डॉ.जोगड साहेब व डॉ.किंगरे साहेब यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. गावात तपासणी दरम्यान सामाजिक अंतर व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
Leave a comment