तिर्थपुरी । वार्ताहर
महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांच्या तुर खरेदी साठी हरियाली ग्रीन व्हेज प्रोडूसर कंपनी लिमिटेड मार्ङ्गत घनसावंगी अंबड तालुक्यातील तीर्थपुरी नाङ्गेड तूर खरेदी एकूण चार हजार 379 कुंटल तुर खरेदी केली असून त्यापैकी 1529 कुंटल चे पैसे शेतकर्याच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती हरियाली ग्रीन व्हेज कंपनीचे चेअरमन डॉक्टर श्री हरी काळे व ग्रेडर अमोल उगले यांनी माहिती देताना सांगितले.
तसेच घनसावंगी व अंबड तालुक्यातील शेतकर्यांनी तुर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदी केलेल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात काही काळ खरेदी केंद्र बंद ठेवून डीएमओ जालना यांच्या मार्गदर्शनाखाली संचारबंदी सोशल डिश सिंग नियम पाळून ऑनलाइन तुर खरेदी नोंदीप्रमाणे शेतकर्यांच्या प्रतिक्विंटल पाच हजार आठशे रुपये प्रमाणे तुर खरेदी करून एकूण खरेदी केंद्रावर चार हजार 379 कुंटल तूर खरेदी झाली असून त्यापैकी 1529 कुंटल चे 8,868 हजार दोनशे रुपयांची पेमेंट शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाले असून उर्वरित खरेदी केलेल्या तुरीची रक्कम लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा केली जाईल तसेच नाङ्गेड तुर खरेदी सण 2019/ 20 यामध्ये हरियाली ग्रीन व्हेज प्रोड्युसर वडीकाळ्या कंपनी मार्ङ्गत या सेंटरवर तूर खरेदी केल्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून बाहेरील बाजारात होणारी शेतकर्याची भावात होणारा आर्थिक ङ्गटका या केंद्रामुळे झाला नाही तसेच ऑनलाइन तुर खरेदीबरोबरच आता हरभरा खरेदी केंद्र याच केंद्रावर सुरू केल्याची माहिती अमोल उगले यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ माहिती देताना सांगितले.
Leave a comment