सोयगाव । वार्ताहर
कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्याकरीता सोयगाव तालुक्यात पोलीस प्रशासनास मदत म्हणुन गावागावात पोलीस मित्राची नेमणूक करण्यात आली असून बुधवारी दि. 29 बुधवार रोजी पोलीस प्रशासनाकडुन पोलीस मित्राना मार्गदर्शन करुन ओळखपत्र देण्यात आले.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक मा. मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्याकरीता विविध मुख्यमार्गावरती तात्पुरत्या पोलीस चौकशी कक्ष उभारण्यात आल्याने मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने पोलीस प्रशासनास याकामी मदत व्हावी करीता गावागावात तीन, चार पोलीस मित्रांची निवड करण्यात आली असुन या निवड झालेल्या मित्रांना त्यांच्या कडुन अपेक्षीत कामाची माहीती देऊन ग्रामस्थांशी कशा प्रकारे जावे याचे मार्गदर्शन सहा. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, ठाणे अंमलदार योगेश झाल्टे यांनी केले तसेच त्यांना ओळखपत्र देण्यात आले. कोरोना संसर्ग वाढत चालला असुन लॉकडाऊन असुन देखील काही नागरीक विनाकारण बाहेर पडतात अशा ठीकाणी नेमणुक केलेल्या पोलीस मित्राची मदत मिळत आहे असुन पोलीस प्रशासनचा वचक निर्माण झाला आहे. यावेळी बनोटी बीट अंमलदार योगेश झाल्टे , दिपक पाटील , सतिष पाटील, विकास लोखंडे, विकास दुबेले , पोलीस पाटील नरेद्र सोळंके,नंदू बापू सोळंके भगवान पवार, एस.डी.सोळंके आदी उपस्थित होते.
Leave a comment