भराड़ी । वार्ताहर
बोरगांव बाजार ता.सिल्लोड येथील परिसरात कोरोनाससंर्जन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर लावलेल्या लॉकडाऊनच्या या कठीन काळात महावितरण कंपनी कर्मचार्यांची सुरक्षा रामभरोसे कर्मचारी करत आहे दिवस राञ जनतेची सेवा, बोरगांव बाजार ता.सिल्लोडसह कोटनांद्रा, सावखेडा, बोरगांव सारवाणी, खातखेडा, म्हसला, टाकळी, तळणी, कासोद, देऊळगांव बाजारसह इतर परिसरात कोरोनारोगाच्या यामहामारी पार्श्वभुमीवर लावलेल्या लॉकडाऊनच्या कठीन काळात काही शेतकर्यांनी उन्हाळ्यात डबल पिक म्हणुन कांदा, बाजरी, शाळु (ज्वारी) सह पालेभाजी पेरले असताना व त्यांना लाईनच्या आपडाऊनमुळे कुठलेच आर्थिक नुकसान होऊ नाही म्हणुन संबधीत कर्मचारी काळजी करताना दिसत आहे.
या ससंर्जन्य महामारीच्या काळात शासनाकडुन त्याच्या सुरक्षितेच्या कुठल्याच उपाय योजना केल्या नसल्याचे दिसुन आले आहे, शासनाकडुन या महावितरण कर्मचार्यांकडे दुर्लक्ष असताना सुध्दा व आपल्याला या कोरोना महामारीच्या काळात जनतेसाठी काहीतरी करायची तळमळ व कर्तव्य म्हणुन महावितरण कंपनी चे कर्मचारी दिवस राञ खेडोपाडी,वाड्या,वस्त्या,शेतावर जाऊन व पाऊसाळ्या पुर्वीचे तारांना आडयेणार्या झाडाच्या फाद्या तोंडण्याच्या कामासोबतच व जनतेला या लाँगडाऊनच्या व कठीण व उन्हापासुन ञास होऊ नाही म्हणुन विशेष काळजी घेताना दिसत आहे. तरी संबधीत महावितरणच्या वरिष्ठ आधिकार्यांनी या कोरोनाच्या माहामारीच्या कठीन काळात गावपातळीवर कामकरणार्यां लाईनमनसह इतर कर्मचार्यांच्या सुरक्षेतेसाठी काही ठोस उपाय योजना कराव्या जेणेकरुन या कर्मचार्याचे मनोबल वाढेल व त्यांना कामकरण्यास प्रोहत्सान मिळेल.
Leave a comment