खुलताबाद । वार्ताहर
तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष वसंता शिरसाट गल्लेबोरगावकर यांनी श्रद्धेय एड . बाळासाहेब आंबेडकर याच्या आदेशान्वये व मा. योगेशजी बन जिल्हा अध्यक्ष (औरंगाबाद पश्चिम), मा.मिलिंद बोर्डे (उपाध्यक्ष) मा.श्याम भार साखळे, महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार साहेब खुलताबाद यांना निवेदन दिले. यामध्ये असे लिहिले आहे की, औरंगाबाद शहर हे अति संवे दनशील भाग आहे. या भागामध्ये दररोज कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत शंभरावर रुग्ण वाढले आहेत. त्या मुळे अशा संवेदनशील भागातून खुलताबाद तालुक्यात येणारे व जाणारे शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना वेळीच पायबंद घाला आणि निवासी ठेवा.नसता खुलताबाद तालुका कोरोनाग्रस्त झाल्याशिवाय राहणार नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या संपूर्ण देशात महारा ष्ट्रात कोरोना महामारीचा हाहा कार माजला आहे.त्यास पायबंद घालण्यासाठी आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासन , पत्रकार नगर पालिका कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. तसेच मा. तहसील दार श्री. राहुल गायकवाड , पोलिस निरीक्षक मेहेत्रे व गटविकास अधिकारी मा. ज्ञानोबा मोकाटे हे सर्व जण अति उत्कृष्ठ कामगिरी बजावत आहे. पण औरंगाबाद शहर विभाग व परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या शंभर पर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त झपाट्याने वाढत आहे. औरंगाबाद येथून दौलताबाद, मार्गे खुलताबाद मार्गे कन्नड पर्यंत दररोज अनेक ठिकाणी अनेक का अधिकारी, कर्मचारी विविध कार्यालयात ये करीत आहेत. उदा. खुलताबाद तालुका ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय कार्यालय, शासकीय रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम, कृषी कार्यालय, पंचायत समिती, ग्रामसेवक, पशुवैद्यकीय दवाखाना मंडळ अधिकारी, तलाठी, नगरपरिषद, बँका, आदि अनेक ठिकाणचे कर्म चारी बिनधास्त ये जा करत आहेत. त्यामुळे यातील एक ही कोरोनाग्रस्त रुग्ण असेल तर त्यांच्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढून रुग्ण शक्यता नाकारता येत नाही. तरी याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
Leave a comment