जालना । वार्ताहर

उकिरड्याच्या जागे वरून झालेल्या वादात चुलत पुतण्याने  वयोवृद्ध चुलत्याचा खून केल्याची घटना  रोहनवाडी येथे काल दि 1 रोजी घडली आहे, या बाबत थोडक्यात माहिती अशी की तालुक्यात रोहनवाडी येथील दगडोबा तनपुरे आणि त्यांचे नातेवाईक राहतात. दगडोबा आणि त्यांचे पुतणे दोन्ही मुले शिवाजी आणि धीरज यांच्यामध्ये तीन वर्षांपासून शेत जमिनीचा वाद सुरू आहे. काल दिनांक 1 मे रोजी दगडोबा तनपुरे हे गावातच त्यांच्या घराजवळ असलेल्या उकिरड्याजवळ थांबले होते. त्याचवेळी त्यांचे पुतणे शिवाजी तनपुरे आणि धीरज तनपुरे हे देखील उकिरड्याववरून खत काढण्याचे काम करत होते. दगडोबा तनपुरे यांनी या दोघांना त्यांच्या हद्दीत रोवलेले सिमेंटचे खांब दुसरीकडे का टाकले ? असे विचारले. तसेच याबाबत सरपंचाकडे तक्रार करण्यासाठी ते जात होते. 

त्याच वेळी शिवाजी आणि धीरज या दोघांनी दगडोबा तनपुरे यांना लोखंडी पाईप, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये दगडोबा हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही सर्व बातमी दगडूबा तनपुरे यांचा मुलगा सोनाजी हा खरपुडी येथे काम करत असताना त्याला समजली. त्यानंतर त्याने जालना सामान्य रुग्णालय गाठले. त्यावेळी शवविच्छेदन कक्षामध्ये आपल्या वडिलांना पाहिल्यानंतर वडिलांची हत्या करण्यात आली असल्याची शंका त्याला आली. त्यामुळे जो पर्यंत वडिलांची हत्या करणार्‍यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास त्याने नकार दिला. शेवटी रात्री उशिरा तालुका जालना पोलीस ठाण्यात दगडोबा तनपुरे यांची हत्या केल्याप्रकरणी शिवाजी अण्णासाहेब तनपुरे, धीरज तनपुरे, सुनील शिवाजी तनपुरे, अनिल शिवाजी तनपुरे, स्वप्निल शिवाजी तनपुरे, मथुरा अण्णासाहेब तनपुरे, जिजाबाई शिवाजी तनपुरे, धीरज तनपुरे, उषा धीरज या आठ जणांविरुद्ध हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रात्री मोठा ङ्गौजङ्गाटा रोहनवाडी येथे पाठवून दगडोबा तनपुरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.