मंठा । वार्ताहर
लॉकडाऊनच्या काळात जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंठा शहरातील व्यापारी एम बी मनियार या कापड दुकानाचे मालक पवन बालाप्रसाद मणियार यांच्याविरुद्ध मंठा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कापड व्यापारी पवन बालाप्रसाद मणियार संसर्गजन्य विषाणूचा प्रसार होईल तसेच संसर्गजन्य रोग प्रसारित होईल असे निष्काळजीपणा करून एकत्र येऊन अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेले स्वतःचे कापड दुकान उघडून कापडाची विक्री करताना आढळून आला त्याने जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय रामा जाधव यांच्या ङ्गिर्यादीवरून आरोपी पवन बालाप्रसाद मणियार यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 136/ 20 कलम 269, 270 भादवि कलम 51 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे याप्रकरणी कापड व्यापारी पवन बालाप्रसाद मणियार यांचे विरुद्ध जमावबंदी आदेशाचा गुन्हा दाखल झाला असला तरी या कापड दुकानांमध्ये लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची नावे अद्याप पोलीस रेकॉर्डला आलेली नाहीत तसेच या दुकानात काम करणार्या कामगारांची नावे संदर्भातही कुठलीच अधिकृत माहिती मिळाली नाही तसेच जीएसटी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Leave a comment