बीड | वार्ताहर
बीड जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षातून शनिवारी (दि.2) सकाळी पाच संशयितांचे थ्रोट स्वँब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. प्रयोगशाळेतूून हे पाचही रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी ही माहिती दिली.
बीड जिल्ह्यात 1 मे रोजी दोघांचे स्वँब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात बीड व अंबाजोगाईतील विलगीकरण कक्षातील प्रत्येकी एकाचा समावेश होता.सायंकाळी दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात 5 जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीला पाठवले गेले. औरंगाबाद प्रयोगशाळेतून सायंकाळी ते सर्व अहवाल प्राप्त झाले. पाचही अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आजपर्यंत तपासणी झालेल्या सर्व निगेटिव्ह रिपोर्टची संख्या 212 वर पोहचली आहे.
Leave a comment