जिल्ह्यातील गरजवंतांना नाम फाऊंडेशनकडून सहाशे किराणा कीटचे वाटप
। वार्ताहर
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गरजवंतांना किराणा सामानाचे सहाशे कीट वाटप करण्यात येत आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत फाऊंडेशनने केलेली ही मदत जनता कधीही विसरणार नाही, अशा शब्दात नाम फाऊंडेशनचे जालना जिल्हा समन्वयक श्री. भाऊसाहेब घुगे यांनी केले.
सुप्रसिध्द सिने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे यांच्या नाम फाऊंडेशनच्यावतीने मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्हा समन्वयक श्री. भाऊसाहेब घुगे, भास्करराव पडुळ, निलेश खंडागळे, वास्तू जगदीश घुगे, प्रकाश जायभाये, निलेश खंडागळे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, जालना, जाफ्राबाद, मंठा, परतूर, अंबड, घनसावंगी आदी तालुक्यांतील धोपटेश्वर, पाडळी, कडेगाव, अकोला निकळक, वंजारवाडी, आन्वी, सेलगांव, केळीगव्हाण, जालना गोंदेगांव, वंजार उम्रद, पिंपळगांव कोलते, किन्ही, जाफ्रावाद शहरातील धनगर वस्ती, पापळ, काचनेरा, तपोवन गोंधन, गंगाराम वाडी, भिवंडी बोडखा, गोसावी, हेलस, दहीपूरी, बारसवाडा, वाटूर फाटा, शेवगा, भायगव्हाण, मच्छिंद्रनाथ चिंचोली, अरगडे गव्हाण, बोरी तांडा, नायगाव, वैद्यवडगांव आदी गावातील हाताववर पोट भरणारे गरीब, शेतमजूर, कष्टकरी, अपंग, विधवा महिला, निराधार, वयस्कर मंडळी, बांधकाम बिगारी कामगार, परप्रांतिय कामगारांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले. सुरक्षीत अंतर राखून आणि गावकर्यांनी सांगितल्याप्रमाणेच अत्यंत गरजवंत यादी तयार करुन नंतर त्यांना सदर कीटचे वाटप करण्यात आले. या कीटमध्ये तुरडाळ, हरबरा दाळ, मीठ पुडा, मिरची पावडर, चहा पत्ती, साखर, हळद पावडर, मोहरी आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
किट वाटपासाठी जिल्हा समन्वयक श्री. भाऊसाहेब घुगे, भास्करराव पडुळ, वास्तू विशारद जगदीश घुगे, प्रकाश जायभाये, निलेश खंडागळे यांच्यासह थोरात, महेश जाधव, किशोर सिरसाठ, दिपक अंभोरे, अमोल ठाकूर, अजय कदम, दत्ता बंगाळे, लक्ष्मण खांदवे, सुभाष पोपट, पवन हरबक, बाळाभाऊ वाघ, भरत दराडे, कैलास सोसे, नंदू दाभाडे, महादू गिते, राजाभाऊ खोरात, भास्करराव कायंदे, जुंबड, रामेश्वर दराडे, किशोर मदन, भगवान जाधव, शिवाजी अंभोरे, सर्जेराव वाघ, नंदाभाऊ वाघ, लक्ष्मण सोळंके, सोळंके, सारीका थोरात, राम वादे, धनजय रामदे, अमोल गाडेकर, सुधाकर सदावर्ते, भागवत खोडवे, अनिल भागवत, गणेश वालझाडे, नरेश कांबळे आदी परिश्रम घेत आहे. यावेळी पुढे बोलतांना श्री. भाऊसाहेब घुगे म्हणाले की, अत्यंत शिस्तबध्द, नियोजनामध्ये सामानाच्या कीटचे वाटप करुन तेथील कार्यकर्त्यांनी जनतेसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाचे जनतेने पालन केले आहे. प्रशासनाला मदत केली आहे. घरात बसून राहिल्यामुळे अनेक कुटुंबांना मदतीची गरज होती. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे यांच्या नाम फाऊंडेशनमार्फत जिल्ह्यात किराणा सामान वाटप करण्याचे ठरल्यानंतर आमच्या सर्वांच्या सहकार्यांतून ही गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्ते करत असल्याचे गौरवोद्गारही श्री. घुगे यांनी काढले
Leave a comment