तिर्थपुरी । वार्ताहर
जि.प.जालना उपाध्यक्ष महेंद्रभाऊ पवार यांनी जि.प.प्रशाला तीर्थपुरी येथे कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारासंबधी तीर्थपुरी आरोग्य केंद्रांतर्गत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत यांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी श्री.पवार यांनी उपस्थीत कर्मर्यांना म्हणाले कि, कोरोना विषाणू हा संसर्गजन्य आजाराशी आज संपुर्ण जग लढत आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात कोरोणाचे सर्वाधीक रुग्ण वाढत आहेत. त्या वर नियंत्रण आणण्यासाठी आपले पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे हे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आपल्या शेजारचा औरंगाबाद जिल्हा शासनाने रेड झोन जाहीर केला आहे. त्यामूळे आपण सर्वांनी सतर्क आपआपली जबादारी व्यवस्थीत पार पाडली पाहीजे, अंगणवाडी कर्मचारी म आशा स्वंयसेविकांनी योग्य समन्वय साधून गावामध्ये बाहेरुन येणारे उसतोड कामगार, ईतर कामधंद्या निमित्त गेलेले गावकरी, जे गावात येत आहेत, त्यांची माहिती घेऊन तात्काळ प्रा.आ.केंद्र व ग्रामपंचायतला कळवावी व त्यांना व त्यांच्या संपर्कात येणार्या कूटुंबातील सदस्यांना भेट देऊन त्यांच्या आरोग्याचा तपशील कळविण्यात यावा.तसेच डेंग्युसदृश ताप रोगा संबंधी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, यावेळी प्रा.आ.केंद्राचे डॉ.गबाळे, डॉ.नाटकर, ग्रामविकास अधिकारी गजानन मुपडे, विनायक बोबडे, बद्रीनाथ मते, रमेश बोबडे, बळीराम लोहकरे. आदी उपस्थीत होते.
Leave a comment