शेतकर्यावर कोराणाचा कोप; जगायचे कसे ...? शेतक-यांना गंभीर प्रश्न...?
कुंभार पिंपळगाव । वाार्ताहर
अशोक कंटुले..घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथील युवक शेतकरी बापू रामभाऊ नागरे या शेतकर्याने बाराशे खोड केळीची या वर्षी केली होती या केळीच्या या पिकासाठी आत्तापर्यंत साधारणता 70 हजार रुपये खर्च त्यांनी केला होता या 5 एकर बागातदार शेतकर्याकडे बाराशे खोड केळीची लागवड करण्यात आली होती मोठ्या कष्टाने मेहनतीने रात्रंदिवस काबाडकष्ट करून रात्री-बेरात्री पाणी देऊन या कुटुंबाने केळीची बाग जगवली होती .
परंतु या कोरोणाचा कोप असल्याने केळीची बाग घेण्यासाठी व्यापारी येत नसून ता. 23 रोजी जालना येथे 101 केळीचे घड हे विक्रीसाठी पाठवले असता या 101 घडाचे 3000 तीन हजार रुपयात पूर्ण माळ विकल्या गेला या ठिकाणी आणि दहा टक्के कमिशन दोन हजार रुपये भाडे खाली करण्याचे 200 रुपये हमाली खाली करण्यासाठी ,शेतातून भरून तीनशे रुपये मजुरी हे सर्व जाता या शेतकर्याला फक्त हातात 80 रुपये मिळाली या या परिस्थितीने शेतकरी फार हेलावून गेला . मागील वर्षी या शेतकर्याने पाण्याअभावी याच शेतातील बाराशे केळीची खोड उपटून टाकली होती सतत दुसर्या वर्षीही केळीचे नुकसान होत असल्याने येथील रामा सोनाजी नागरे ह्या शेतकर्याने आपल्या मुलाला बाग तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला असे त्यांनी सांगितले आज त्यांनी केळीची बाग तोडली त्यांना अश्रू अनावर झाले होते शेतकर्यावर शेतीमाल विकल्या जात नसून पिकवलेला माल विकत नसल्याने शेतकर्यावर संकट कोसळत आहे आणि हा कोरोणाचा कोप वाढतच चालल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
Leave a comment