आज औरंगाबादेत आणखी 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले
औरंगाबाद । वार्ताहार
राज्यात कोरोना विषाणूचा कहर पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये गेल्या 24 तास 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज औरंगाबादेत आणखी 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा 144 वर पोहोचला आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. औरंगाबादमध्ये काल दिवसभरात 21 रुग्ण आढळले होते. तर आज 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता कानन येळीकार यांनी याबाबतची माहिती दिली. औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासात नव्या 35 रुग्णांची भर पडली आहे.
औरंगाबादमध्ये आतापर्यंत 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 23 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी औरंगाबादमध्ये मेडिकल आणि रुग्णसेवा वगळत इतर सर्वकाही बंद राहणार आहेत. तसेच दूध, भाजीपाला आणि किराणामालासह सर्व अत्यावश्यक सेवाही ठराविक वेळेत चालू राहणार आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
Leave a comment