तळणी \ वार्ताहर
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथील होलसेल किराना मालाचे विक्रेते दिलीप भंडारी हे किराना मालाची विक्री करत असतांना शासनाने कोरोना साथरोगाची चैन मोडुन काढण्यासाठी सोसियल डिसटंसींग ठेऊन विक्री करन्यास सांगितले व सकाळी सात ते दोन च्या वेळेतच मालाची विक्री करन्याची सुचना केलेली असतांना हे मालाची विक्री वेळेत करत नसुन मर्जीतल्या मानसांना कधीही माल देत असुन चढ्या भावाने देत असल्याची तक्रार ग्रामस्थ केशव येऊल , बाळासाहेब राऊत यांनी तहसीलदार मोरे यांच्याकडे दुरध्वनीद्वारे केली असता. तहसिलदार सुमन मोरे,महसुलचे अव्वल कारकून आर.आर.राखे व तलाठी नितीन चिंचोले यांनी दुपारी बारा ते साडे बाराच्या सुमारास अचानक भेट दिली . यावेळी दुकानावर एकच गर्दी असुन सोसीयल डिसटन्सींग ची पायमल्ली करत असल्याचे चित्र दिसुन आले असुन तक्रारदाराने तक्रार केल्याप्रमाणे हजारो मालाची विक्री करत असुन केवळ सातच वस्तुचे भाव फलक लाऊन ग्राहकांची फसवणुक करत सोसीयल डिसटन्सींग म्हनुन एक मिटर अंतरावर गोल रिंगण मार्किंग दिसुन आले नाही.यावेळी केशव येऊल यांनी 24 एप्रील रोजी खरेदी केलेल्या मालाची कच्ची पावतीही सादर केली माञ पक्या बिलात आणि दिलेल्या कच्या बिलात तफावत आढळुन आल्याने पंचासह दुकानदारा समक्ष पंचनामा करून नियमांचे ऊलंग्घन करत असल्याचे दिसून आल्याने पुढील कार्यवाहीसाठी एक प्रत तळणी येथील ग्रामसेवक यांना देण्यात आली असुन पुढील कारवाईसाठी वरीष्ठांना अहवाल सादर केल्याचे तलाठी यांनी सांगितले.
यावेळी गावकरी ज्ञानेश्वर येऊल यांनी हे काम स्थानीक स्वराज्य संस्थेचे असुन तळणी येथील ग्रामविकास अधिकारी सेवाळे हे हजर राहत नसल्याने हा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे
Leave a comment