जालना । वार्ताहर
भाग्यनगर येथील अजिंक्य निवास येथे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल व राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना आजारा सोबत लढणार्या जिल्ह्यातील 1000 हजार पेक्षा जास्त आय एम ए आयुर्वेदिक होमिओपॅथिक युनानी डॉक्टरांना राजेश टोपे यांच्या सूचनेवरून सुरक्षा कवच वाटप करण्यात आले.
पक्षाच्यावतीने राज्यभर जीवाची परवा न करता आरोग्य कर्मचारी कोरोना संसर्ग संशयित व इतर रुग्णांवर उपचार करत आहेत तसेच कोरोणासारख्या विषाणूजन्य आजाराशी लढतअसलेल्या डॉक्टरांना सुरक्षा कवचाचे वाटप करण्यात येत आहे त्या अंतर्गत जालना जिल्ह्यातील सुमारे एक हजार पेक्षा जास्त डॉक्टरांना सुरक्षा कवचाचे वाटप करत असताना आय एम ए 300 सुरक्षा कवच डेंटल असोसिएशन पन्नास सुरक्षाकवच परतूर मंठा तालुक्यातील 150 सुरक्षाकवच जाफराबाद भोकरदन 150 सुरक्षाकवच घनसावंगी 150 सुरक्षाकवच जालना शहर 100 सुरक्षाकवच वाटप करण्यात आले याप्रसंगी आयएमएचे सचिव डॉ रवींद्र बेदरकर डेंटल असोसिएशनचे डॉ प्रशांत पळणीटकर आयुर्वेदिक डॉक्टर असोसिएशनचे डॉ योगेश कचवा होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनचे डॉ संदीप चोपडे यांनी सुरक्षा कवच स्वीकारून आ राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल चे आभार मानले. या प्रसंगी मा आ अरविंद चव्हाण, श्री बबलू चौधरी, श्री कपिल आकात, श्री योगेश ढेंबरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल नंदकुमार जांगडे, राजेंद्र जाधव, दीपक उढान, शेख साजिया, तयबा देशमुख, कैलास मगरे आदी उपस्थित होते. सेलच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश ढेंबरे यांनी आलेल्या सर्व डॉक्टर मंडळींचे आभार मानून आरोग्याची काळजी घेण्याची केली.
Leave a comment