226 क्टिंटल 60 किलो कापसाची आवक ,7 शेतकर्यांनी विक्रीस आनला होता कापुस
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्र ता. 29 बुधवार रोजी सुरू करण्यात आले ता.17 एप्रिलपासून ऑल लाईन नोंदणी सुरू करण्यात आली होती 29 एप्रिल पर्यंत 9000 नऊ हजार कापूस उत्पादक शेतकर्यांनी नाव नोंदणी केली आहे. कुंभार पिंपळगाव परिसरात कापूस मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने शेतकर्यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी वारंवार केली होती सध्या देशभर कोरोना विषाणू चा आजार पसरत असल्याने गेल्या चाळीस दिवसापासून कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते परंतु अनेक शेतकर्यांचा कापूस घरात असल्याने शेतकर्यांना अडचण ठरली होती.नवीन वर्षाच्या आर्थिक शेतीची जुळणी होत नसल्याने कापूस खरेदी करून सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.
कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शासनाने आदेश देऊन सोशल डिस्टनसिंगचे पालन करत कापूस खरेदी केंद्रास परवानगी देण्यात आली आहे. सध्या कापूस खरेदी केंद्रावर 20 शेतकर्यांचा कापूस खरेदी करण्यात येईल असे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसा एसएमएस.ए.आर भिल्लारे हे शेतकर्यांना मोबाईलद्वारे देणार आहेत. एस.एम.एस मिळालेल्या शेतकर्यांनी कापूस खरेदी केंद्रावर घेऊन यावे असेही यावेळी सांगण्यात आले. शेतकर्यांनी ज्यांच्या नावे नोंदनी केली आहे त्यांनी कागदपत्रासह स्वत:हा उपस्थितीत राहावे. बाजार समितीच्या वतीने बाजार समिती नांव नोंदनी याद्या पाहण्यासाठी आलेल्या शेतकर्यांनी हात धुऊन, सॅनीटायझर, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंग नियमांचे पालन करावे असे कडक आदेश बाजार समिती कडून देण्यात येत आहेत. सोमवारी कापूस खरेदीस बाजार समिती मध्ये आलेल्या कापूस वाहानांचे नारळ फोडून उद् घाटन बाजार समितीचे संचालक अजिम खा पठाण यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी साहय्यक निबंधक ए.जे. भिल्लारे घनसावंगी कापूस तपासणीस (ग्रेडर) पवन बोबडे , सचिव विष्णू बाहेकर कापूस खरेदी केंद्रप्रमुख राहुल गुजर, शेतकरी, कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.
Leave a comment