मंठा । वार्ताहर
हेलस ग्रामपंचायतचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष पांडुरंग खराबे पाटील यांच्या पुढाकाराने पर जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांची आज दि. 25 एप्रिल शनिवार रोजी घरी जाऊन आधुनिक तापमापी यंत्रांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील चव्हाण, सिस्टर एस. व्ही. बुक्तरे यांनी आरोग्य तपासणी केली.
पर जिल्ह्यातून उसतोड मजुर गावात आल्याने यांची तपासणीची मागणी ग्रामस्थ यांनी केली होती वैद्यकीय यंत्रणेचा पाठपुरावा करून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक लोने यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी केली यावेळी सिस्टर बुक्तरे आशाताई एस सी भगत सोबत ग्रामविस्तार अधिकारी नंदकुमार घनवट यांची उपस्थिती होती घरी जाऊन केलेल्या आरोग्य तपासणी मुळे मजूर वर्गातील कुटुंबामध्ये आणि गावकरी मंडळींमध्ये आनंद व्यक्त होत आहे 22 मार्चपासून लॉक डाऊन असल्यामुळे हेलस गावचे ऊसतोड मजूर पर जिल्ह्यामध्ये अडकले होते शासनाने त्यांना मुळगावी येण्याची परवानगी दिल्यानंतर आपल्या गावी आलेल्या मजुरांना कुठलीही बाधा होऊ नये म्हणून कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याने गावकर्यांमध्ये पर जिल्ह्यातून आलेल्या ऊस तोड मजुरा बद्दल असलेला संभ्रम वातावरण दूर झाले आहे
Leave a comment