औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद मध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असून दिवसभरात १९ रुग्ण सापडल्याने एकच खळबळ माजली आहे . त्यामुळे औरंगाबादेतील कोरोनाबाधीतांची १२८ झाली.आहे. असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगीतले.
औरंगाबाद मध्ये कोरोना रुग्ण वाढतच असून
८ नव्या रुग्णांत नुर कॉलनीत ३ आसिफिया कॉलनीत ३ आणि किल्ले अर्क येथे २ जणांचा समावेश आहे. शहरात कोरोनाग्रस्तांची वाढ वेगाने होत आहे. बुधवारी सकाळी ११ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात नूर कॉलनी ११, गारखेडा १ व भीमनगर १ अशी रुग्ण संख्या असल्याची माहिती डॉ.येळीकर यांनी दिली.यासोबतच शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १२० वर गेली आहे.
कोरोना बाधितांच्या संपर्कातील रुग्णात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यात नवीन हॉटस्पॉटची भर पडत असल्याने शहर समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर आले आहे. बुधवारी सकाळी नूर कॉलनी ११, गारखेडा १ व भीमनगर १ अशी रुग्ण संख्या वाढली आहे. यात गारखेडा या नव्या हॉटस्पॉटची भर पडली आहे. यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
तत्पूर्वी साेमवारी एकाच दिवशी सर्वाधिक 29 रुग्ण पाॅझिटिव्ह ठरले हाेते. मंगळवारी त्यात आणखी 27 जणांची भर पडली. त्यामुळे एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 109 वर गेली होती. विशेष म्हणजे गेल्या 24 तासांतच हा आकडा दुप्पट झाला आहे. दरम्यान, मंगळवारी घाटीत एका महिलेचा मृत्यू झाला. निधनानंतर तिचा अहवाल तपासणी केला असता ही महिलाही पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता शहरात बळींची संख्या सातवर गेली आहे.
सोमवारी हिंगोलीत 6, उदगीरमध्ये ३ नवीन रुग्ण आढळले होते. मंगळवारी हिंगोली जिल्ह्यात 5 वर्षीय बालक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. नांदेडहून 4 दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पोहोचलेल्या भाविकांपैकी 6 जण पॉझिटिव्ह असल्याचे पंजाबने नांदेड जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. तथापि, मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांत मात्र एकही नवीन रुग्ण आढळला नाही. मराठवाड्यातील एकूण रुग्णसंख्या 144 झाली आहे.
बाधित भागातील बँका बंद
आैरंगाबादेत आता जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ३ मेपर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने उघडी ठेवता येतील, असे आदेश पाेलिस आयुक्तांनी काढले. मेडिकल वगळता इतर आस्थापनांसाठी हा आदेश लागू राहील. बाधित भागातील बँकांच्या सुमारे ५० शाखा ३ मेपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही सर्व बँकांनी घेतला आहे. तसेच शहरातील इतर भागातील बँकांची वेळही सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंतच असेल.
Leave a comment