पो.नि.चतुर्भुज काकडे, उपनिरीक्षक नाडे, व पो.नि.संजय देशमुख यांच्या वतीने कारवाई व चौकशी
जालना । वार्ताहर
जालना शहरातील मामाचौक परिसरा मध्ये वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पो.निरि. संजय देशमुख सहकार्यांसोबत वाहनांची कसून तपासणीन करत आहेत. कोरानाच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या लाकडाऊन अधिक कडक करण्यात आले आहे.राज्य शासनाच्या वतीने काही जिवनावश्यक वस्तूच्या खरेदी विक्री च्या अस्थापनांना चालू करण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. परंतू अनेक नागरीक विनाकारण शहरात फिरत असल्याचे आढळून येत आहेत. बर्याच नागरीकांना बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता, समाधानकारक ऊत्तरे न दिल्यामुळे कारवाई करण्यात येत आहे.
तरी पण अत्यावश्यक सेवे व्यतिरीक्त नागरीकांनी घरा बाहेर पडून विनाकारण फिरू नये, तसेच मास्कचा वापर व सोशल डिस्टेन्सिंग ठेवणे आवश्यक आहे.असे वाहतूक शाखेच्या वतीने वारंवार नागरीकांना अवाहन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखा व सदर बाजार पो.स्टे. यांच्या वतीने संयुक्तीक रित्या शहरातील मामाचौक येथे वाहनधारकांची चौकशी व तपासणी करून वाहने जप्त करण्यात येत आहेत. पोलिस अधीक्षक एस चैतन्य,मा.अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, मा.उप विभागिय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली.वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे, उपनिरीक्षक नाडे, व सदर बाजार पो.स्टे. संजय देशमुख यांनी आप आपल्या कर्मचार्यांच्या सहकार्याने धडाकेबाज कारवाई केली आहे.
Leave a comment