जालना । वार्ताहर
जागतिक पातळीवर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून याचा प्रभाव भारतासह जालना जिल्ह्यातही दिसून येत आहे. देशातील आरोग्य कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांची काळजी घेत आहे. या परिस्थितीत आरोग्य कर्मचार्यांच्या संरक्षणासाठी कीट ची आवश्यकता लक्षात घेऊन केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना इंडियन मेडिकल असोसिएशन जालना यांना जालना जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार देणार्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक इत्यादी कर्मचार्यांकरीता 250 कीट आज दि.28 एप्रिल रोजी वाटप केले.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.मोहन मणियार, डॉ.कपिल मगरे, डॉ.माधव आंबेकर, डॉ.संजय राख, डॉ.क्रिस्टोङ्गर मेजिस, डॉ.हितेश रायठठा, डॉ.बेदरक, डॉ.मुंदडा, डॉ.सोमाणी, डॉ.प्रदीप घोडके आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भास्करराव पाटील दानवे, राजेश राऊत, अशोक पांगारकर, सतीष जाधव, सिद्धिविनायक मुळे, शशिकांत घुगे, धनराज काबलीये, संजय देठे, बद्री पठाडे, अर्जुन गेही, प्रशांत वाढेकर, प्रशांत गाढे, सुहास मुंडे, रोषण चौधरी, विष्णू डोंगरे आदींची उपस्थिती होती.
Leave a comment