मंठा । वार्ताहर
माणुसकी हाच धर्म समजून मंठा शहरातील काही युवक एकत्र येत सकाळी सात वाजता एका वाहनातून गरम पोळी ,भाजी, लोणचं आणि पाणी लहान मुलांना बिस्कीट पाकीट घेऊन जालना जिल्ह्याची हद्द असलेल्या देवगाव ङ्गाटा ते जालना दरम्यान कोरोना परिस्थितीमुळे गावाकडे पायी निघालेल्या कुटुंबाची भूक व तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मागील आठ दिवसापासून लॉकडाऊन मुळे अडकलेल्या लोकांनी आता घरचा रस्ता धरला आहे सोबत लहान लेकरं किरकोळ लागणार सामान घेऊन दर मजल दर कोस दर मुक्काम करून घर गाठायचे. लॉक डाऊन मुळे हॉटेल बंद खाण्यापिण्याचे हाल त्यात शेकडो विद्यार्थी सुद्धा उन्हातानात रस्त्याने पायी जाताना जीव कासावीस होतो असे म्हणतात की, देव उपाशी उठवतो पण उपाशी झोपू देत नाही या उक्तीप्रमाणे शहरातील युवक देवदूत म्हणून पुढे सरसावले सकाळी चार वाजता उठणे पाच वाजता शहरातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंगल कार्यालयात येणे तिथून पुढे स्वयंपाकाची तयारी सकाळी पाच ते सात स्वयंपाक तयार आणि सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सोशल डिस्टन्सचे पालन करून भुकेलेल्यांना जेवण तहानलेल्यांना पाणी हा माणुसकी जपणारा उपक्रम सुरू केल्यामुळे मंठा शहरात या होतकरू युवकांचे कौतुक होत आहे या सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देणार्या यातील काही युवकांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता प्रथम त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आम्ही जे करतोय त्याची आम्हाला कुठलीही प्रसिद्धी नको आमच्या नावाची कोणती बातमी नको अशी विनम्र विनंती केली या युवकांमध्ये सर्व क्षेत्रातील युवकांचा समावेश आहे.
Leave a comment