जालना । वार्ताहर
कोरोना विषाणुवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच कोरोना आजारानेग्रस्त नसलेल्या हायरिस्क रुग्णांना देण्यात येणार्या उपचारांकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले कोव्हीड-19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात सर्व संबंधित अधिकार्यांच्याआढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकार्यांची उपस्थिती होती कोव्हीड-19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, नॉनकोव्हीड आरोग्य सेवेबाबत अधिक प्रमाणात दक्षता घ्यावी.
ज्या रुग्णांना क्षयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब,एआरटी रुग्ण यासारख्या अतिजोखमीचे रुग्ण आहेत, त्यांना देण्यात येणार्या औषधोपचारावर विशेष लक्ष देण्यात यावे. बालक व गरोदर मातांची तपासणी प्राधान्याने पुर्ण करण्यात यावी. तसेच लसीकरण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी उपस्थित अधिकार्यांना दिले. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात औरंगाबाद येथुन जालना येथे येणे, जाणे करणार्या अधिकारी, कर्मचार्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यात प्रवेश न देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला केल्या.
Leave a comment