जालना । वार्ताहर
लॉकडाऊनच्या काळात समाजातील गरजुंना विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आजपर्यंत 3 लाख 24 हजार 663 फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील मदत शिबीरामध्ये स्थलांतरीत कामगारांना 30 बॉक्स बिस्कीट पुडे विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांच्याकडून प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकुण 945 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 76 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 624 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 26 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 831 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 02 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 798, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 116, एकुण प्रलंबित नमुने-27 तर एकुण 548 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 19, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 352 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 01, सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -291, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-14, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 76, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 151 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 415 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 69 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 468 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण 2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 291 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना - 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-18, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-15, पोलीस प्रशिक्षण केंद्र-110, मंठा येथे 13, परतुर येथे 08 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि.28 एप्रिल, 2020 रोजी जालना तालुक्यामध्ये सांगली येथुन 15 व सातारा येथुन 04 असे एकुण 19 कामगार, बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-66, कोल्हापुर-50 व सातारा-150 असे एकुण 266 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-28, पुणे-45,सांगली 176, कोल्हापुर-119, सातारा-354, सोलापुर-73, लातुर-2 व अहमदनगर येथुन 07 असे एकुण 804 कामगार दाखल झाले आहेत. जालना जिल्ह्यात परजिल्ह्यातुन आतापर्यंत 1 हजार 313 कामगार दाखल झाले आहेत.
Leave a comment