भोकरदन । वार्ताहर
देशभरात तसेच राज्यात कोरोना व्हायरस ने मोठा उच्छाद मांडला असून या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या व यशश्विनी अभियान च्या प्रमुख खा सुप्रिया सुळे यांनी राज्यातील प्रमुख समन्वयीका शी व्हिडिओ कॉन्ङ्गरन्स द्वारे संपर्क साधून कोरोना संदर्भात काय परिस्थिती आहे याचा नुकताच आढावा घेतला आहे.
जालना जिल्ह्यातील यशश्विनी अभियानच्या प्रमुख समन्वयीका वंदनाताई हजारे यांच्या शी नुकताच संवाद साधून जालना सह भोकरदन, जाङ्गराबाद, अंबड, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा सह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊन या पुढे यशस्विनी अभियान व राज्य शासनाने काय उपाययोजना कराव्यात यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली व मार्गदर्शन ही केले. तसेच गोरगरीब जनतेला व गरजू लोकांना मदत तसेच रेशन मिळण्या संदर्भात अडचणी निर्माण झाल्यास यशश्विनी अभियान च्या महिला समन्वयीका यांनी लक्ष घालण्याचे आदेश दिले तसेच प्रशासकीय यंत्रणा कशी काम करत आहे या संदर्भात ही सुळे यांनी माहिती घेतली. तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्या बद्दल ही त्यांनी समाधान व्यक्त केले. लॉक डाऊन पाळा व सुरक्षित राहा असा संदेश ही शेवटी सुप्रिया सुळे यांनी दिला.
Leave a comment