सागर ट्रॅव्हल्स पलटून सहा ठार तर रुग्णवाहिका-ट्रक अपघातात चौघांचा मृत्यू

बीड | वार्ताहर

आष्टी तालुक्यातील धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला दौलावडगाव जवळ वळण घेत असताना नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बीड- नगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव नजीक बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडला. दुसऱ्या एका अपघातात आष्टी फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल उलटून सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  आज सकाळी सहा वाजता अपघाताची ही घटना घडली.

आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक (क्र. एम एच 21 एक्स 8600 ) हा धामणगाव कडून अहमदनगर दिशेने जात होता. रात्री साडे अकरा वाजेदरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने (क्र. एम एच 16 क्यू 9507 ) जोरदार धडक दिली. 

या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे (वय 35, रा. धामणगाव ता. आष्टी), मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखंडे, (दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के (वय 35, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी) यांचा अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघातात ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, वय 45, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भीषण अपघाताची दुसरी घटना आज पहाटे 6 वाजता आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील आष्टा फाटा नजीक घडली.मुंबईहुन बीडकडे जात असलेल्या सागर ट्रॅव्हल्सवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती ट्रॅव्हल्स पलटली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमीवर आष्टी, जामखेड येथे उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आमदार सुरेश धस यांनीही अपघातस्थळी धावून जात माहिती जाणून घेतली.या दोन भीषण अपघातांनी बीड जिल्हा हादरून गेला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.