उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांची कारवाई
विहामांडवा | वार्तहार
पैठण गेल्या काही महिन्यापासून तालुक्यातील पैठण हिरडपुरी , दादेगाव , आय टाकळी अंबड सह पैठण शहरातील विविध भागात वाळू चोरी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली . वाळू चोरी रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी स्वतः हिरडपुरी , आय , टाकळी अंबड शिवारात जाऊन तलाठी मंडळ अधिकारी , पोलिस पाटील यांना सोबत गोदावरी नदी कडे जाणारे रस्ते खोदले . त्यामुळे चोरी करण्यासाठी रस्ता नसल्याने वाळू हतबल झाल्याचे पहावयास मिळाले .
आठ दिवसांपासून महसूल विभागाकडून चोरी रोखण्यासाठी पथक पाठवण्यात वाळू येत होते . परंतु वाळू चोरांचे लोकेशन मजबूत असल्याने पथक येताच त्यांनी माहिती मिळत होती . त्यामुळे वाळू चोर पळून जाण्यास यशस्वी होत होते . उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे , प्रभारी तहसीलदार दत्तात्रय नीलावड यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी अनोखी शक्कल लढवत गोदावरी पात्रात जाणाऱ्या रस्त्यात मोठा खड्डा खोदून वाळू चोरांचे वाहन गोदावरी नदीत जाण्यास अडथळा निर्माण केला . त्यामुळे वाळू हतबल झाल्याचे पहावयास मिळत आहे नदीकडे जाणाऱ्या रस्त्यात खोदलेला खड्डा बुजवण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी गावातील सजग नागरिक व पोलिस पाटील यांनी लक्ष ठेवावे . खड्डा बुजवणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी सांगितले .
Leave a comment