औरंगाबाद । वार्ताहर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलकांनी आमदार व खासदार तसेच मंत्र्यांच्या घरासमोर घोषणाबाजी करत ढोल बजाओ आंदोलन सुरू केले आहे.
औरंगाबादेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरासमोर घोषणाबाजी करत ढोल बजाव आंदोलन करण्यात येत आहे, त्यामुळे त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Leave a comment