औरंगाबाद । वार्ताहर
संजय नगर मध्ये वर्षभरापासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर औरंगाबाद वार्ड क्रमांक 56 संजय नगर येथे मागील एक वर्षापासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर ती वाहत्या पाण्यामुळे परिसरातील रहिवाशांना या रोडवर चा वापर करण्यासाठी विचार करावा लागतो यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते गेल्या चार-पाच महिन्यांपासून महानगरपालिकेत खेटे घालत आहेत पण कुंभकरण झोपेतील महानगरपालिका प्रत्येक वेळेस काही ना काही कारण पुढे करून चालढकलपणा करत आहे.
मिळाला पिण्याचे पाणी आल्यास ड्रेनेज मधून तर नदीच वाहते हे पाणी खालील रहिवाशांच्या यांच्या घरात शिरते महानगरपालिका प्रत्येक वेळेस थातूरमातूर काम करून खूप काही केल्याचं अभिमान मिरवते तिकडे देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री स्वच्छ शहराची संकल्पना राबवत असताना संजय नगर उपाशी यांच्या नशिबी मात्र एका वर्षापासून गटारगंगेत मधून जाणे-येणे करावे लागत आहे परिसरातील रहिवाशांन वरती ही वेळ फक्त महानगरपालिकेच्या लहरी पणामुळे आली आहे जर लवकरात लवकर हे काम नाही झालं मनपा विरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा पोलीस बॉईज असोशियन व युवक काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.
Leave a comment