गंगापूर । वार्ताहर
कोरोनाच्या संकटकाळात औरंगाबाद शासकीय रुग्णालय घाटी येथे रक्ताचा तुटवडा असताना गंगापूर शहरात खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गंगापूर शहरात तब्बल 87 रक्तदात्यांनी रक्तदान केले. एमआयएम टीम गंगापूर व शासकीय रुग्णालय घाटी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील जैन मंगलकार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उदघाटन पत्रकार बिलाल भाई जलील यांच्या हस्ते झाले यावेळी मुन्शी भय्या पटेल, समीर बिल्डर, अब्दुल राफे, वसीम अहेमद, झिशान पटेल, अबदल्ला बिनहिलाबी, फेरोज मुलतानी, मुबिन सिद्दीकी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गंगापूर शहरातील तब्बल 87 रक्तदात्यांनी या शिबीरात रक्तदान केले.
यावेळी औरंगाबाद शासकीय रुग्णालयाच्या रक्तसंकलन केंद्राचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ रवी राठोड, डॉ प्रियंका यनकुरे,डॉ प्राची मोडवाल, शुभांगी कटारे, शैलेंद्र शेळके,मझहर शेख,अविनाश देहाडे, शुभम सोळुंके,सतीश खारमाटे, आदींची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार रमाकांतभय्या बनसोड, अयुब पटेल खालेद नाहदी, बदर जहुरी, मनीष वर्मा, नवाब शेख, वाल्मिक शिरसाठ, महावीर कटारिया ,अमीन पटेल, अनवर बागवान, खलील पटेल रिजवान पठाण आदी मान्यवरांनी शिबीरास भेट दिली व हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी गंगापूर शहरातील चळच् टीम चे फैसल बासोलांन राहुल वानखेडे, अब्दुल सत्तार, इम्रान खान, अशपाक सय्यद , जुबेर सिद्दीकी, मुबिन शेख, सुरज नरवडे यांच्या सह च्या आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले
Leave a comment