पैठण /प्रतिनिधी :-
सन 2019 मधील फळबाग पिकविमा मिळवा यासाठी 14 सप्टेंबर सोमवार रोजी पैठण तहसील येथे छावा क्रांतिवीर सेना मार्फत आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यासंदर्भात आज मंगळवाररोजी तहसीलदार चंद्रकांत शेळके व तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी संयुक्तरित्या उपोषणस्थळी भेट देत फळबाग पिकविमा मिळावा या मागणी बाबत आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि आपली मागणी अतिशय रास्त आहे. फळबाग पिकविमा मिळावा यासाठी उर्वरित सात मंडळ पात्र आहेत अशा आशयाचे अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवून संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करत त्याचा अहवाल दोन दिवसात आंदोलनकर्ते यांना देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतरच अमरण उपोषण स्थगित करण्यात आले.यावेळी विशेष सहकार्य माजी आमदार मा.संजयभाऊ वाकचौरे, पाणी कृती संघर्ष समिती अध्यक्ष श्री आप्पासाहेब निर्मळ, अडवोकेट सुभाष खडसन, अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आतिष गायकवाड यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सहकार्य केले.
आंदोलनकर्ते प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत,मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, जिल्हा सचिव भगवान सोरमारे, कारभारी सोनवणे, योगेश भालके, ज्ञानेश्वर वतारी, याकूब पठान, देवीदास सोनवने, नानासाहेब भाकरे, आप्पासाहेब गवारे, राजेंद्र काळे, परमेश्वर जाधव,परवेश गिर्हे, विशाल व्यवहारे,परमेश्वर गरड, रोशन भालके, दामोदर काळे, दिनकर सोनवणे,परमेश्वर कपटी, निखिल कातबने, भाऊराव धरम, माजी सरपंच अशोक जाधव,भास्कर जाधव, कृष्णा काळे, प्रल्हाद सोनवणे गोविंद बावणे, कृष्णा बावणे, राकेश वाघे, ऋषिकेश वाघे,काशिनाथ राऊत, गणेश गरड, संजय करंगळ, कार्तिक बावणे, अनिल मगरे, बलभीम फलके,पांडुरंग भावले, पांडुरंग भावले आदी शेकडो शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a comment