बोरगांव बाजार । वार्ताहर
सिल्लोड येथे दि.15 सप्टेबर रोज मंगळवारला लोकसत्ता युवा संघटनेच्या विभागिय कार्यलयाचे उटघाटन कार्यक्रम संपन्न. सल्लोड येथे दिनांक 15 सप्टेबर रोज मंगळवारला लोकसत्ता युवा संघटनेच्या विभागिय कार्यलयाचे उट्घाटन सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजेंद्र बोकडे हस्ते करण्यात आले, यावेळी राजेद्र बोकडे यांचे स्वागत लोकसत्ता युवा संघटना मराठवाडा अध्यक्ष शेख इस्माईल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला, यावेळी उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना बोकडे यांनी असे सांगितले की संघटनेत काम करताना संघटनेने व शासनाने ठरवुन दिलेल्या नियमानुसार काम करा,व आपल्या घाईगडबडीत केलेल्या कृत्यामुळे संघटने प्रतिमा मलीन होईल असे काम करु नका,गोर गरीबांच्या न्याय हक्कासाठी लढा व त्यांना न्याय मिळवुन द्या, यावेळेस काही मदत पाहीजे असल्यास आम्ही केव्हाही द्यायला तयार आहोत असे आपल्या भाषणातुन सांगितले, तर संघटनेच्यावतीने नवनिर्वाचित पदाधिकार्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी लोकसत्ता युवा संघटना मराठवाडा अध्यक्ष शेख इस्माईल, कोषाध्यक्ष अब्दुलरहेमान शेख,उपाध्याकक्ष कलीम शेख, सिल्लोड तालुकाध्यक्ष विशाल चव्हाण, उपाध्यक्ष शकील शेख, सचिव याकुब कुरैशी, अजिंठा सर्कल प्रमुख सर्फराज शेख, बोरगांव सर्कल अध्यक्ष मुमताज पठाण, उपाध्यक्ष मुकिम पटेल, डॉ.एजाज पठाण, शेख शेरु, शेख शफी, सय्यद अजिम, शेख युनूस यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार अॅड.उस्मान शेख यांनी मानले केले.
Leave a comment