औरंगाबाद । वार्ताहर

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार व प्रसिद्ध वास्तुविषारद श्री. दास यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांसोबत पैठण येथील विख्यात संत ज्ञानेश्वर उद्यानाची नुतनीकरण व आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने पाहणी केली. यावेळी राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व राज्याचे जलपसंपदा सचिव नागेंद्र शिंदे, विभागीय आुयक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, मुख्य अभियंता (लाभक्षेत्र) श्री. दिलीप तवार उपस्थित होते. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार आणि श्री. दास यांनी उद्यानाची पाहणी केली. तदनंतर उद्यानातील बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालयास भेट दिली. यावेळी मुख्य सचिव म्हणाले की, या उद्यानाला वृक्षांच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणात निसर्ग संपत्ती लाभली आहे. या संपत्तीचा उपयोग होणे गरजेचे असून यासाठी लवकरण विकास आराखडा बनविणे आवश्यक असल्याचेही  संजय कुमार म्हणाले. त्यानंतर उद्यानातील सेंट्रेल स्कूल म्युझिकल फाऊंटेन, कारंजे, वॉटर स्पोर्ट, आराखडा इत्यादीची माहिती अधीक्षक अभीयंता राजेंद्र काळे यांनी मुख्य सचिव व  श्री. दास यांना दिली. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार यांनी उद्यानातील कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्याचे फलोल्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सदरच्या उद्यानाचा विकास झाल्यास कशाप्रकारे पर्यटनाला चालना मिळेल याविषयी मार्गदर्शन केले. पैठण येथे किमान एक दिवस तरी पर्यटकांनी मुक्काम करावा जेणेकरुन पर्यटनाला चालना मिळेल, असेही श्री. भुमरे म्हणाले. उद्यानात येण्यापुर्वी मुख्य सचिव  संजय कुमार यांनी पैठण येथील प्रसिद्ध जायकवाडी धरणास भेट दिली. यावेळी त्यांनी धरणाच्या साठ्याविषयी व पुढील दोन वर्षाच्या संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी धरण कसे उपयोगी पडते याविषयीची माहिती श्री. शिंदे यांच्याकडून घेतली. यावेळी त्यांनी धरणाच्या साठ्यास विधीवत नारळ अर्पण केले. याअनुषंगाने  सचिव श्री. शिंदे यांनी पुरनियंत्रण करताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातुन येणार्‍या पाण्याचे नियमन करण्यासाठी वापरण्यास येणार्‍या वायरलेस यंत्रणा कार्यवाहीची माहिती मुख्य सचिव यांना दिली.

Leave a comment

Switch to plain text editor

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.