विहामांडवा । वार्ताहर
विहामांडवा ते टाकळी अंबड या प्रधानमंत्री ग्राम सड़क रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था रस्त्याने झाली आहे. बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठा त्रास लागत सहन करावा लागत असून, लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विहामांडवा ते टाकळी अंबड या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त जड वाहनांची वाहतूक होते. यामुळे सदर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, शेतकर्यांना रस्त्याची चाळणी झाली आहे, तसेच या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने वेड्या बाभळीचा विळखा पडलेला दुरुस्ती असून, या रस्त्यावरून वाहन चालवणे जोखमीचे बनले आहे.
संबंधित विभागाकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याने जाणारे शेतकरी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मध्यंतरी नागरिकांनी स्वत : परिश्रम घेऊन रस्त्याचे खड्डे बुजविले होते. मात्र, क्षमतेपेक्षा जड वाहनांची वाहतूक होत असल्याने पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लवकरच साखर कारखाना सुरू होणार असून, ऊस उत्पादक शेतकर्यांना रस्त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता असून, लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Leave a comment