लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाण्याचा अनोखा विश्व विक्रम 

वर्ल्डक्लास औरंगाबाद चिकलठाणा लिओ क्लबची स्थापना व पहिला पदग्रहण सोहळा संपन्न

औरंगाबाद । वार्ताहर

दि.11 सप्टेबर 2020-आखिल विश्वात आपल्या अविरत निस्वार्थ सेवेसाठी ओळखल्या जाणार्‍या लायन्स क्लबच्या औरंगाबाद चिकलठाणा या शाखेने आपल्या लौकिकाला साजेसा एक अनोखा विश्व किर्तीमान स्थापन करून आपल्या शहराचे नाव उंचावले आहे. किशोरवयीन तरुणांना समाजसेवेची ओढ लागावी या उद्दात हेतूने म लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने वर्ल्डक्लास औरंगाबाद चिकलठाणा लिओ क्लबची स्थापना करण्यात आली. यात लिओ अल्फा क्लबमध्ये 5111 सदस्यांची नोंदणी करून लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणाने एक अनोखा विश्व विक्रम केला आहे. संपूर्ण विश्वात 210 देशात विखुरलेल्या क्लबमध्ये आपल्या मायभुमिची शान राखत व शहराला गौरवांकित करून चिकलठाणा क्लबने हा किर्तिमान स्थापन केला आहे. वर्ल्डक्लास औरंगाबाद चिकलठाणा लिओ क्लब अल्फा या नूतन क्लबची स्थापना व पहिला पदग्रहण सोहळा काल उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्षपदी लिओ कुणाल गुप्ता, सचिवपदी लिओ कुशाग्र अग्रवाल व कोष्याध्यक्षपदी लिओ प्रीती झलवार यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.

काल व्हर्चुअल पद्धतीने पार पडलेल्या सोहळ्यास लायन्स क्लब इंटरनॅशनल चे सेकंड व्हॉईस व इंस्टॉलींग

ऑफिसर लायन ब्रायान शिहान प्रमुख पाहुणे म्हणून तर उद्घाटक म्हणून इंटरनॅशनल डायरेक्टर लायन डॉ. नवल मालू, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सीए विवेक अभ्यंकर, गेस्ट ऑफ ऑनर लायन राजेंद्र बाबू दर्डा, मल्टिपल कोसेलींग चेअरपरसन लायन गिरीश मालपाणी, प्रथम व्हॉईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन दिलीप मोदी, द्वितीय व्हॉईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन पुरुषोत्तम जयपुरीया, रिजन चेअरपरसन व लिओ क्लब अडव्हायजर लायन राजेश जाधव, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी लायन राहुल औसेकर, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेझरर लायन मोरेश्वर कुलकर्णी, एम डी लिओ कॉर्डीनेटर लायन महावीर पाटणी, डिस्ट्रिक्ट लिओ कोडर्डीनेटर लायन कुशाल भाटिया, लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लायन सौरभ पंच, लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लायन कृष्णा सोनी, क्लब अध्यक्ष लायन संजीव गुप्ता, क्लब सचिव लायन विनोद चौधरी, कोष्याध्यक्ष लायन राजेश शुक्ला, प्रोग्राम कॉर्डीनेटर लायन डॉ. प्रवीण सूर्यवंशी, व्हॉईस कॉर्डीनेटर एमजेएफ लायन जयकुमार थानवी हे होते. क्लबचे अध्यक्ष लायन संजीव गुप्ता यांनी स्वागतपर भाषण केले तर लायन रमेश पोकर्णा यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. लायन राहुल औसेकर यांनी सूत्रसंचालन केले तर लायन डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन रमेश पोकर्णा, लायन राजेश भारूका, लायन निधी अग्रवाल, लायन जितेंद्र महाजन, लायन मंदार दाते, लायन भरत भालेराव यांनी परिश्रम घेतले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.