आठ दिवस घालवले परंतु प्रशासनाची कोणतीही हालचाल नाही
विहामाडंवा । वार्ताहर
विहामाडंवा परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पाऊसासह जोरदार वार्यामळे शेकाडो एकरातील ऊस, बाजरी, मक्का, कापूस आदि पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकर्यांना तातडीने पंचनामे होण्याची अपेक्षा आहे. परंतु पाच दिवस लोटूनही कृषी प्रशासन महासूल विभागा कडून परिणाम कारक कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. विहमाडंवा, नवगाव, तुळजापूर, इंदेगाव, ब्रम्हागाव, टाकळी, हिरडपुडी, ही गावे जायकवाडी लाभक्षेत्रातील ऊस व इतर बागाईत पिकासाठीची आहेत. व रविवारी सायंकाळी या परिसरात वादळी पाऊस व जोरदार वार्यामुळे शेकाडो एकरातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. मागील वर्षी ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली,व ऊस संध्य 12 ते 15 कांडीवर आहे, व दीड महिन्यात कारखान्यांनाला जाणार आहे बाजरीचे पीकही निश्चित होते. आणि कोरोनाच्या उद्रेकात अशाच पिकाची पेरणी झालेली आहे. परंतु रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस व जोरदार वार्यायामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकर्यांच्या आशेवरच पाणी फिरले.
शेतकर्याच्ये मोठे आर्थिक नुकसान झाले.त्यातच प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा लवकर होणे आवश्यक पंरतू संबंधित प्रशासनाच्या ढिसाळ आणि मनमानी कारभारामुळे दिरंगाई होते आहे यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.नैसर्गीक संकटाबरोबरच सुल्लतानी संकट देखील शेतकर्यांची परिक्षा पाहत आहेत, शासनाच्या ढिसाळ कारभार व दिरंगाईमुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत , तरी संबंधित विभागाच्या पथकाने त्वरीत पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे
Leave a comment