तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते यांची मागणी

सावळदबारा । वार्ताहर

टिटवी ता सोयगाव शिवारात बैल,गाय चरत असताना बिबट्याने  हल्ला करून ठार केले आहेत टिटवी परिसरातील शेतकरी मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत टिटवी  शिवारातील शेतात बैल ,गाय चरत असताना  बिबट्याने बैल,गायीवर हल्ला करून ठार केले आहेत शेतात चरत असताना बिबट्याने ओढुन जंगलात नेले  सावळदबारा येथिल दोन शेतक-याचे एक बैल,एक गाय होती बिबट्याने हल्ला करून एक बैल गाय ठार केल्यामुळे परिसरातील शेतकरी मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत या आगोदर सुध्दा याच परिसरात शेतक-यांचे बिबट्याने गाय, बैल ,बकरीचे नुकसान केले आहेत   सावळदबारा भागातील ग्रामस्थ सह शेतकरी मध्ये घबराट निर्माण झाली आहेत. सावळदबारा सह परिसर हा डोंगर भाग असल्याने वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहे बिबट्या हल्ला करत असल्यामुळे सावळदबारा सह परिसरात दहशत निर्माण झाली आहेत शेतात चरत असताना बिबट्याने

 हल्ला करून  बैल गाय ठार केले दोन दिवसापासुन शोधाशोध सुरू असल्यामुळे  टिटवी च्या जंगलात 9 सप्टेंबर रोजी आढळून आले वन विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहेत सावळदबारा येथिल भास्कर कोते यांची गाय व साबीर लुखमान यांचे बैल होते सावळदबारा शिवार हा परिसर सर्पूण डोंगर भागात आहेत पाच महिनापूर्वी वन विभागाने नांदागाव शिवारात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता वनपरिक्षेत्र अधिकारी एस पी मांगदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ,पी ए गवळी एस बी खरडे,डि,ए,वाघ,गोपाल ननावरे,यानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या बिबट्याचे हल्लामुळे शेतकरी ग्रामस्थ मध्ये घबराट निर्माण तर झालीच परंतु त्याचे पशुधनास धोका निर्माण झाला आहे या अगोदर सुद्धा सावळदबारा परिसरात बिबट्याचे हल्ला झालेल्या आहेत वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यात पशुधानाची हानी झालेल्या शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते,गजानन दांडगे, दिनकर शिपल्कर,एकनाथ सपाटे,विजय रावळकर व शेतक-यांनी केली आहेत

वन विभागाने नुकसान भरपाई देण्यात यावी

 बिबट्याने हल्ला करून दोन जनावरांना  ठार केले आहेत वन विभागाने तात्काळ या नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी व  अशी मागणी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते यांनी केली आहेत

सावळदबारा परिसरात वन्य प्राण्यांकडुन पिकाची नुकसान  

सावळदबारा परिसरात खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे परंतु सावळदबारा परिसरातील ठिकठिकाणी च्या शिवारातील  पिके सुध्दा बहरली आहेत  कपाशी,मका,चे रोही व वन्य प्राणी नुकसान करत आहेत सावळदबारा हा डोंगर भाग असल्यामुळे डोंगरात हरीण.बिबट्या.राननडुक्कर.रोही.कोल्हा.आदी वन्य प्राणी आहेत वन्य प्राणी हे रात्री सुमारास येऊन मका  खात असल्यामुळे पिकाचे नुकसान करत आहेत  त्यामुळे शेतक-यांना राखन करण्यासाठी शेतात जावे लागत आहेत परिसरातील मका,कपाशी,सोयाबीन,  पिकाचे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी  नुकसान करत आहेत सावळदबारा परिसरातील नुकसान झालेल्या शेतक-यांना वन विभागाने नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते व परिसरातील शेतकरी करित आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.