‘कोरोना’ च्या वाढत्या प्रभावामुळे उपासमारीची वेळ
औरंगाबाद । वार्ताहर
सध्या देशात राज्यात कोरोना ह्या आजाराने थैमान घातलं असून सर्वच व्यावसायिकांवर याचा दुष्परिणाम परिणाम आपल्याला दिसत आहे असाच आपल्या शालेय विद्यार्थ्यांना वाहनातून ने आन करणार्या वाहन मालक, चालक, तसेच ड्रायव्हर याच्या वर देखील याचा मोठ्या परिणाम झालाय कोणत्याही प्रकारचे दुसरे उत्पन्न नसताना घरातील आर्थिक परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे त्यात काही वाहने ही वेगवेगळ्या फायनान्स, बँक लोन वर असून शासनाने दिलेल्या आदेशाने येणार्या महिन्यापासून वाहनाचे हप्ते भरावे लागणार अशा अनेक समस्या त्याच्या समोर निर्माण झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर दि 10 सप्टेंबर 2020 रोजी शालेय विद्यार्थी वाहतूक चालक मालक संघटनेच्या वतीने सामाजिक अंतर मास्क सॅनिटायझर चा वापर करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की विद्यार्थ्यां वाहतूक करणार्या चालक मालक याना दर महा 10000 अनुदान शासनाच्या वतीने देण्यात यावे, वाहतूक वर वाहन विमा संरक्षण व्यवसायिक कर व्हॅन सुदृढता कर हे सर्व एक वर्षा साठी माफ करावे, शाळेला सुट्टी असल्यास ह्या वाहनांना राज्यात सार्वजनिक वाहतूक साठी परवानगी द्यावी अश्या अनेक मागण्या या निवेदनातच्या माध्यमातून देण्यात आल्या यावेळी खालील प्रमाणे संघटनेचे पदाधिकारी दादाराव काळे, सदाशिव डापके, शेेेख फिरोज, सागर जोशी, विकास यशवंंते आदींची उपस्थिती होती.
Leave a comment