औरंगाबाद । वार्ताहर
जीवन गौरव सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा क्षेत्राला वाहिलेले मासिक मार्फत आयोजित ऑनलाईन शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा अंबरनाथ ठाणे येथे आँनलाईन संपन्न झाला. जीवन गौरव ऑनलाइन मुख्याध्यापक शिक्षक गुणगौरव सोहळया प्रसंगी कोकण विभागातील ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी शेषराव बडे ,एकात्मिक महिला बालविकास विभागाचे अधिकारी संतोष भोसले, पंचायत समिती अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी अशिष मनोहर झुंजारराव, केंद्रप्रमुख पाटील मॅडम, पवार मॅडम ,चिखलोली मँडम, भाल केंद्रातील मुख्याध्यापक , जीवन गौरव मासिकाचे संपादक रामदास वाघमारे , उपसंपादक मीरा वाघमारे, ठाणे जिल्हा सहसंपादक मोहीनी बागुल यांच्या संकल्पनेतून आँनलाईन पुरस्कार वितरण करण्यात आले.
सुंदर आँनलाईन डिजिटल प्रमाणपत्र देऊन खालील मुख्याध्यापक शिक्षक यांना शिक्षक दिनानिमित्ताने गौरविण्यात आले. या मध्ये नाविन्यपूर्ण मुख्याध्यापक रोहिदास मदन चव्हाण,रमेश चींधू परदेशी,प्रमोद हेमा पाटील, नाविन्यपूर्ण शिक्षक मोहिनी पंडित बागुल,मनीषा आनंद वसईकर, उमा महेश घोलेकर ,योगिता अरविंद मिसर,आरती अनिल नागभिडकर, इत्यादी मुख्याध्यापक शिक्षक यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे आँनलाईन सुत्रसंचलन मोहीनी बागुल यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख सरिता पाटील यांनी मानले.
Leave a comment