औरंगाबाद । वार्ताहर
रविवारी झालेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले आहेत, खड्ड्यात पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी आज रस्त्यावर उतरून आंदोलन केले, तसेच महापालिकेने आठ दिवसात शहरातील रस्ते दुरुस्त न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, मागील पंचवीस वर्षे सत्तेत असणार्यांनी फक्त मौजमजा केली. त्यामुळे शहराची ही अवस्था झाली आहे.
शहरातील नागरिक पूर्ण टॅक्स भरतात, मात्र त्यांना कोणत्याही चांगल्या सुविधा मिळत नाहीत. शहरातील रस्ते खराब झाले आहेत, महापालिकेचे पाणी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महानगरपालिकेने आठ दिवसात नागरिकांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा खासदार इम्तियाज दिले यांनी आज दिला.
Leave a comment