संतप्त जमावाने पेटवली आयशर

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरुळ येथील दुर्घटना  

पाचोड । वार्ताहर

भरधाव वेगातील आयशरने समोरुन येणार्‍या दुचाकीला चिरडल्याने या भीषण दुर्घटनेत दुचाकीस्वार चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.दरम्यान अपघात घडल्यानंतर आयशर चालक घटनास्थळावरुन  पळून जाण्याच्या बेतात असतांना  संतप्त जमावाने अपघातग्रस्त  आयशरचा पाठलाग करुन त्याला आडविले. त्यानंतर आयशरला पेटवून दिल्याची घटना  औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरुळ फाटा (ता.पैठण) येथे बुधवारी ता.2 रोजी राञी 8;30 सुमारास घडली.दरम्यान अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी दाखल घेत पेट घेतलेल्या आयशरला बर्‍याच प्रत्नानंतर  विझवले.  रामनाथ सांडू  बमनावत वय (38) रा. निहालसिंग वाडी ता. अंबड असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

या अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, निहालसिंगवाडी ता.अंबड येथील रामनाथ सांडू बमनावत हे दैनंदिन कामे आटोपून दुचाकी क्रमांक एमएच 20 एसी 0749 ने आपल्या गावी निहालसिंगवाडीकडे  जाण्यासाठी निघाले असतांना दरम्यान राञी साडे आठ वाजेच्या सुमारास दाभरुळ फाट्यावर योताच नेमके त्याचवेळी मेडिकलच्या कपाशीच्या गाठी (रोल) घेऊन अंबडकडून औरंगाबादकडे जाण्यासाठी भरधाव वेगाने येणारा आयशर क्रमांक एमएच 20 सीटी 2198 ने समोरुन  दुचाकीला चिरडल्याने या घटनेत दुचाकीस्वार रामसिंग बमनावत यांना गंभीर दुःखापत झाल्याने ते  जागीच गतप्राण झाले. हा भीषण अपघात घडल्यानंतर  आयशर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला.परंतु  संतप्त जमावाने त्याचा  पाठलाग करुन  दाभरुळ फाट्याजवळ त्याला आडवून रागाच्या भरात असलेल्या जमावाने आयशरला पेटवून दिले. आयशर मध्ये कापशीच्या गाठी असल्याने आयशरने क्षणार्धात  मोठा पेट घेतल्याने औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय  महामार्गावर राञीची वेळ असल्याने मोठा आगडोंब उडाल्या सारखे वाटत असल्याने ये-जा करणार्‍या  अन्य वाहनचालकांमध्ये माञ काही काल भितीचे वातावरण पसरले होते.या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी गोरखनाथ कनसे, नुसरत शेख, जीवन गुढेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पेट घेतलेल्या आयशरची आग विझविण्याचा पर्यंत केला. मात्र आगाने रौद्ररुप धारण केल्याने त्यांना यश येत नव्हते. त्यामुळे त्यांनी औरंगाबादच्या  अग्निशामक दलास पाचारण करुन त्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या अपघाताची नोंद पाचोड ता.पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.