बोरगाव बाजार । वार्ताहर
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या पवित्र भूमीत ‘धर्माचे पालन करणे! पाखंड खंडन! हेचि करणे आम्हा काम! बिज वाढवावे नाम!’ हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र वारकरी मंडळाच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या सहसचिवपदी ह.भ.प.सुभाष मनगटे यांची नियुक्ती करण्यात आली.
आजचा समाज शारीरिक, मानसिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हावा तसेच सुसंस्कारी, सदाचारी, व्यसनमुक्त व्हावा. समाजामध्ये संत साहित्याची ओळख, जागृती व आवड निर्माण व्हावी यासाठी अध्यात्मिक ज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या विचारांचा प्रचार-प्रसार व प्रबोधनाच्या माध्यमातून गावोगावी लोकांचे संघटन करून,समाजातील हिताच्या गोष्टींसाठी संघर्ष करून ,समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला सुख,समाधान,आनंद आणि शांतता प्राप्त व्हावी आणि समाजामध्ये एकमेकांविषयी आपुलकी, प्रेम,बंधुभाव प्रेरित करून समृद्ध,बलशाली भारत निर्माण व्हावा. व प्रत्येक व्यक्तीने देशभक्तीने प्रेरित होऊन समाजकार्य करावे असे बहुमोल सामाजिक प्रबोधन महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने करण्यात येते,नेहमीच लोकाभिमुख वृत्ती राहिलेल्या या वारकरी संतांच्या भूमीत रात्रंदिवस लोकांत राहून बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य तसेच परमार्थासाठी प्रपंच सोडून अरण्यात जाण्याची व व्यावहारिक कर्मांना फाटा देऊन सन्यास घेण्याची आवश्यकता नाही व मनुष्याचा मोठेपणा त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर नसून वैयक्तीक चारित्र्यावर आहे असेही वारकरी महामंडळाच्या वतीने सांगण्यात येते. यावेळी सन्मानपत्र स्वीकारून बोलताना समाजकार्यात प्रत्येक वारकरी आदर्श वारकरी घडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहून समाजाभिमुख कार्यावर भर दिला जाईल असेही ह.भ.प.सुभाष मनगटे यांनी सांगितले.
Leave a comment