पैठण । वार्ताहर
महात्मा फुले कृषीविद्यापिठा अंतर्गत सेवा संस्थेच्या मालदाड तालुका संगमनेर येथील श्रमशक्ती कृषीमहाविद्यालयातील कृषीदुत निलेश अशोक मोरे यांचे ग्रामीण कृषी जागृकता व औद्योगिक कार्यानुभव 2019-2020 च्या अभ्यास दौर्याचे पैठण तालुक्यातील राहटगांव येथे आगमन झाले येथील ग्रामस्थानी निलेशचे स्वागत मोठ्या उत्साहात केले.
कृषीदुत निलेश मोरे यांनी शेतकर्यांना शेतीविषयी अनुभव व शास्त्रीय माहिती दिली व सद्या कोरोना महामारी सुरू असल्याने त्यांनी शेतकर्यांना सुरक्षतेचे पाठ व सामाजिक आंतर बाजार पेठेत गेल्यावर घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली तर अभ्यास दौ-याच्या चार महिण्याच्या कालावधीत माती परिक्षण, पाणी व्यावस्थापन, किड रोग व पिक संरक्षण याबाबत माहिती देणार आहेत .यावेळी उपसरपंच कैलास फासाटे ग्रामसेवक तुळशीराम पोतदार सदस्य वाहिद शेख, पुरूषोत्तम ईरतकर आदींनी सत्कार करून निलेशला शुभेच्छा दिल्या तर या श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एल.हारदे, कार्यक्रम अधिकारी एन.बी.शिंदे, एन.पी.तायडे, टि.डी साबळे, एस.के.गजभिये आदींच्या मार्गदर्शनाखाली निलश मोरे हा शेतकर्यात जावून कार्य करत आहे.
Leave a comment