औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना 2019-20 या शैक्षणिक वर्षात शालांत, उच्च माध्यमिक व पदवी परीक्षेमधील गुणवत्तेच्या आधारे पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, त्यासाठी माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये झालेल्या परीक्षेत 60 टक्के व त्याहुन अधिक गुण असणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, औरंगाबाद यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत सादर करावयाचे आहेत. तसेच जे माजी सैनिक, माजी सैनिक विधवा काही कारणास्तव त्यांच्या पाल्यांचे 2019-20 पुर्वी उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळणेबाबतचे प्रकरण पहिल्या वर्षी सादर करू शकले नसतील त्यांनी ज्या त्या वर्षामध्ये म्हणजेच व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्षासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, औरंगाबाद यांचेकडे संपर्क साधावा (दूरध्वनी क्रमांक 0240-2370313), असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, औरंगाबाद यांनी केले आहे.
Leave a comment