खुलताबाद । वार्ताहर
संपूर्ण देशात कोरोना महामारीने हाहाकार माजविला आहे. त्याचे पडसाद शहरी भागासह ग्रामीण भागातही वाढत आहेत. ही वाढ होऊ नये , तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात संचारबंदी व जमावबंदीत कोरोना महामारीचा प्रसार वाढू नये यासाठी औरंगाबादचे तत्कालीन जिल्हा अधिकारी उदय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासनाने आपला कर्तव्य बजावून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करत आहे. या प्रसंगी खुलताबाद येथील तहसीलदार तथा आपत्ति व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व शासकीय यंत्रणा च्या वतीने कोरोनावर मात करण्यासाठी युद्ध पातळी वर कार्य होत आहे.
हे कोरोना योद्धा आपल्या व कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता अविरत सेवा देणारे स्वस्त धान्य दुकानदार , पेट्रोल पंप , गॅस एजन्सी मालक व चालक, अंबुलेन्स चालक व मालक या सर्व कोरोना योद्धांचा सत्कार व सन्मान व्हावा यासाठी पत्रकार सेवा संघटनेनी पुढाकार घेऊन संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष मा. रामनाथ जर्हाड, मा. अर्जुन अरगडे यांच्या आदेशानुसार आणि मा. सुनील वैद्य जिल्हाध्यक्ष , मा. अविनाश कुलकर्णी जिल्हा सचिव , मा. वसंता शिरसाट गल्लेबोरगावकर जिल्हा संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यलयातकोरोना योद्धांना तहसीलदार राहुल गायकवाड यांची प्रमुख उपस्तिथित सन्मान पत्र व ढाल देऊन सत्कार करण्यात आला आहे.
यावेळेस कोरोना योद्धा म्हणून तहसिलदार राहुल गायकवाड ,पोलिस निरीक्षकसीताराम मेहेत्रे व पोलिस कर्मचारी, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, व न.प कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय खुलताबादचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जगताप व आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी, तसेच कोरोनाने मेलेल्या सर्व जाती धर्माच्या रुग्णांचा दफन विधी करणारे व अग्निडाव देणारे भाई कफनवाले आणि मस्तान ग्रुपचे मुस्लिम समाज बांधव व यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोनाकाळात अविरत ला देणार्या ज्येष्ठ पत्रकार संजय हिंगोलिकर, जगदीश विवेक पाठक, मा.राठोड, संतोष करपे, श्रीकांत कुलकर्णी,इसाक कुरैशी, आजिनाथ बारगळ, बाबासाहेब दांडगे, मच्छीन्द्र घोरपडे, हुसेन पटेल, सुनील मरकड, शेख जमीर,सलमान खान, शेख कलीम,आदि पत्रकारांना कोरोना योद्धांचा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमचे आयोजक पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हा संघटक वसंता शिरसाट गल्लेबोरगावकर होते.
Leave a comment