परभणीत शिवरायांच्या साक्षीने यथोचित सत्कार करेल 

बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांचे पालकमंत्री नवाब मलिक यांना पत्र 

जालना । वार्ताहर

मराठवाड्यात परभणी जिल्ह्यातील शेतकरी विष्णू शिंदे व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी महादेव बिक्कड यांनी बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी आत्महत्या केली आहे. इंदोरच्या ईगल सीड्स कंपनीने राज्यात लाखो क्विंटल सोयाबीनचे उगवण क्षमता नसणारे बोगस बियाणे विक्री करून शेतकर्‍यांची ङ्गसवणूक केली आहे परभणी जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी या कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत लाखो हेक्टरवरचे सोयाबीनचे बियाणे उगवले नाही बियाणे वाया गेले त्याचबरोबर खत आणि श्रमही वाया गेले. शेतकर्‍यांचं एक वर्षाचे पूर्ण पीक वाया गेले एकदा दोनदा तीनदा बियाणे पेरून उगवले नाही. इंदूरला जाऊन आम्ही त्यांना अटक करू अशी घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री नवाब मलिक यांनी घोषणा केली होती त्याबद्दल सर्वप्रथम माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोगस बियाणे विकणार्‍या इंदोर येथील इगल सीड्स कंपनी मालकाला अटक करण्यासाठी परभणी येथून पोलीस पथक नेमून त्यांना अटक करू असेही आपण म्हणालात ईगल्स कंपनीने सोयाबीनचे बोगस बियाणे आणि त्यासोबतच महाराष्ट्र सरकारच्या बियाणे महामंडळ यांनी लाखो क्विंटल बोगस बियाणे विकले आहे ईगल कंपनी बरोबरच महाराष्ट्र सरकारच्या बियाणे महामंडळाने देखील शेतकर्‍यांची ङ्गसवणूक केली आहे.

लाखो शेतकर्‍यांचा विश्‍वासघात आणि ङ्गसवणूक करणार्‍या ईगल सीड्स कंपनी असो किंवा बियाणे महामंडळाचे एमडी, मार्केटिंग अधिकारी, विभागीय अधिकारी यांनीसुद्धा ङ्गसवणूक केली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील कंपन्यांनी सुद्धा अशीच ङ्गसवणूक केली आहे आपण शेतकर्‍यांची बाजू घेतली, इंदोर ला जाऊन ईगल कंपनीच्या मालकाला अटक करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल शेतकर्‍यांचा प्रतिनिधी म्हणून आभार मानत, ‘वादा किया है तो निभाना पडेगा ...‘ अशा शब्दात दिलेला शब्द पाळावा लागेल असेही लोणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे ईगल कंपनीच्या मालकाला आणि महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत असणार्‍या बियाणे महामंडळातील दोषी अधिकार्‍यांना अटक केल्यास मी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुख्य चौकात शिवरायांच्या साक्षीने तुमचा शाल श्रीङ्गळ हार देऊन भव्यदिव्य सत्कार करेल परंतु तसे न झाल्यास मंत्री पदाचा राजीनामा देऊन आपल्याला प्रायश्‍चित्त करावे लागेल असेही लोणीकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.  शेतकर्‍यासाठी बोलणं आणि ते करून दाखवणे यात ङ्गरक आपण करणार नाही अशी अपेक्षा देखील लोणीकर यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.