बोरगांव बाजार । वार्ताहर
राज्य शासनाने सरसकट दोन लाख रुपया कर्ज माफीची धोषणा करुन कर्ज माफी सुध्दा मोठा गाजावाजा करत दिली,परंतु यामध्ये नियमित कर्ज फेडणार्या शेतकर्यांचा विचार केला गेला नाही,कारण शासनाकडुन त्याना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्यात येईल अशी धोषणा यावेळी शासनाकडुन केली गेली होती, नियमित पीक कर्जदार फेडणार्यां शेतकर्यांना शासनाकडून नियमित कर्जफेड प्रोत्साहन अनुदानापोटी अजूनही 50 हजार रुपये देण्याची धोषणा करण्यात आली होती,पण नियमित कर्ज परतफेड करणार्यां शेतकर्यांना 50 रुपये अनुदानाची प्रतीक्षा अद्यापर्यत संपलेली नाही, व हि धोषणा शासनाने अजुन पर्यत पुर्ण झालेले नाही आहे,हे अनुदान संबंधित शेतकर्यांना तातडीने मिळावे अशी मागणी शेतकर्यांतुन होत आहे परंतु, अद्यापही शासनाने या नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांसाठी कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी नाराज आहेत,
सध्या खरिपातील पिकांच्या मशागतीचे कामे सुरू आहे. शेतकर्याचा खर्च वाढला आहे, तणनाशके, मजुरी, किडनाशके, खते यासाठी पैसा लागतो.त्यामुळे शेतकर्यांना पैशांची तातडीची गरज आहे,शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करून नियमित कर्जदारांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली होती, परंतु त्याची अंमलबजावणी अजुन पर्यत केली नाही. शासनाचा निधी उशिरा आला, तर त्याचा खरिपा पिकासाठी उपयोग होणार नाही,यामुळे नियमीत कर्जदार शेतकर्यांमध्ये अन्यायाची भावना तयार होत आहे,याशासनाच्या धोरणामुळे पुढे थकीत पीक कर्जाचे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही,कारण शेतकरी पीक कर्ज भरण्यास नकार देतील,पर्यायाने शासनाचे नुकसान होईल, यामुळे नियमीत कर्जदारांना शेतकर्यांना तातडीने 50 हजार रुपयाचे अनुदान द्यावे, असा मागणी नियमित कर्जभरणार्यां शेतकरी वर्गात होत आहे.
Leave a comment