भराडी । वार्ताहर
येथून जवळ असलेल्या वांगी खुर्द येथे शुक्रवारी झालेल्या जोरदार वादळी वार्यासह पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.त्याच वेळी विशाल पाटील मुरकुटे यांनी शेतात जाऊन पाहणी करून तहसीलदार यांना पंचनामे करण्याची मागणी केली होती. त्याचीच आज दखल घेऊन तासिलदार यांनी संबंधित तलाठी यांना पंचनामे करण्याची सांगितले. तलाठी माने यांनी वांगी येथे तात्काळ धाव घेऊन नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे केले.यावेळी सोबत विशाल पा मुरकुटे, अंजितराव पा महाकाळ, सुभान पठाण,अजिनाथ महाकाळ,आदी शेतकरी उपस्थित होते.
Leave a comment