खुलताबाद । वार्ताहर
शुलिभंजन ग्रामपंचात मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाउ साठे यांच्या शंभराव्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रातील सहित्य क्षेत्रातील तसेच त्यांनी आपल्या सहित्यातुन दलित, श्रमिक शेतकरी, अशा अनेक घटकांचे वास्तववादी लिखाण करत सहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी सयुक्त महाराष्ट्र व भारत स्वतंत्र चळवळी मध्ये अग्रक्रमाने भाग घेऊन देश सेवा केली आहे.
स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल अग्रगण्य व्यक्तिगत विचारवंत साहित्यिक कवी प्रबोधनकार व समाजसुधारक याकरीता साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांचे 2020 हे जन्म शताबदी वर्ष आहे. तसेच आण्णाभाऊ साठे यांचे सहित्य क्षेत्रातील नाव व समाजिक कार्य आणि त्याचे योगदान व त्यांनी लोककलेतुन सांगितलेले विचार अखंड भारतासाठी खरोखरच अंगीकारण्याची आज गरज आहे. यावेळी सरपंच सय्यद इलियास सय्यद युनुस, माजी सरपंच द्वारकानाथ घोडके, ग्रामपंचात सदस्य नितिन जाधव, संतोष बोडखे, रामदास निंभोरे, तंटामुक्ती अध्यक्ष सैय्यद रफीक सैय्यद युनुस, पोलिस पाटील भारत देवकर, दत्तू आण्णा फुलारे., विष्णु घुसळे, साईनाथ गायकवाड, आण्णा बनकर, विकास घाटे, सोमीनाथ अंभोरे, पारस गवळे, शाहरुख सैय्यद आदि उपस्थित होते.
Leave a comment