औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 409 जणांना (मनपा 372, ग्रामीण 37) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 10601 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 204 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14327 झाली आहे. आजपर्यंत एकूण 478 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3248 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सायंकाळनंतर 133 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 20, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 34 आणि ग्रामीण भागात 75 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (75)-औरंगाबाद (12), फुलंब्री (1), गंगापूर (7), खुलताबाद (1), सिल्लोड (9), वैजापूर (13), पैठण (11), सोयगाव (21)
सिटी एंट्री पॉइंट (20)-गेवराई (2), छावणी (1), वाळूज (1), दीप नगर (1), रमा नगर (1), कुंभेफळ (1), खुलताबाद (1), कन्नड (1), विठ्ठल नगर (1), मुकुंदवाडी (2), वडगाव (1), लक्ष्मी कॉलनी (1), जाधववाडी (2), नक्षत्रवाडी (1), पैठण (1), सिद्धार्थ नगर (1), राधास्वामी कॉलनी (1)
मनपा (04)-एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), विष्णू नगर (1), संजय नगर, बायजीपुरा (1), चिकलठाणा (1)
Leave a comment