पाचोड परिसरातील हजारो शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित
पाचोड । वार्ताहर
सलग तीन वर्षे लहरी हवामानामुळे, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न व अनेक आजारांना तोंड देत तसेच शेतीनेही शेतकर्यांची दगा दिल्याने शेतकर्यांनी घेतलेल्या अनेक कर्जांचे हे थकीत मध्ये गेले शेतकरी हतबल होऊन कर्जाचा डोंगर वाढत गेला व शेतकरी थकीत झाले तसेच शेतकरी हे एकमेकांना जामीनदार राहत असल्याने शेतकरी दुसर्याने कर्ज भरण्याची ऐपत नसलेला कर्ज भरल्याने तसेच दुसर्या कुठल्याही प्रकारचे कर्ज हे थकीत झाल्याने ते संगणक प्रणाली असल्याने बँका गरज नसतानाही या शेतकर्यांची सिबिल बघून शेतकर्यांना पीक कर्ज नाकारत असून यामुळे हजारो शेतकरी पीककर्जापासून वंचित राहत आहे.
महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या शेतकर्यांना कर्जमाफी जाहीर केली असून, या वर्षी मान्सूनने साथ दिल्याने पिके जोमात असून या पिकाच्या मशागतीसाठी शेतकर्यांच्या हातामध्ये तात्काळ चलनाची आवश्यकता असल्याने नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकर्यांना कर्जमाफी झाल्याने पुढील कर्ज घेण्यासाठी बँकाकडे जावे लागत असून ऑनलाइन प्रणाली कर्ज मागणी अर्ज करण्याचे सांगण्यात आले होते. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर बँकेकडून ज्या वेळेस मेसेज येईल असे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर बँकेत कागदपत्रे घेऊन हजर व्हावे लागत आहे पाचोड येथे दोन राष्ट्रीयकृत व एक जिल्हा सहकारी बँक आहेत येथे नवीन कर्ज वाटप सुरू झाले असून यासाठी शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात बँकेत येणे सुरू झाले असून ऑनलाईन पीक मागणी अर्ज, सातबारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक तसेच सर्व बँकेच्या बॅबागे वगैरे सर्व देऊन बँकेत जावे लागते हे कागदपत्र जमा करताना शेतकर्यांची दमछाक होत असते. त्यातच लाँकडाऊन असल्याने शेतकरी त्रस्त असून यामध्ये सर्व पुत्राचा पूर्तता झाल्यानंतर बँके कडून तुमचा सिबील स्कोर खराब असल्याने अर्ज नाकारण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे या शेतकर्यांना हातात घेऊन रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे तेव्हा याबद्दल वरिष्ठ पातळीवरून पीक कर्जासाठी सिव्हिल धरू नये व शेतकर्यांना वेठीस धरून अजुन आत्महत्येस प्रवृत्त करू नये असे शेतकर्यांकडून चर्चा होत आहे.
मी घरासाठी महिंद्रा फायनान्स कडून गृहकर्ज घेतले होते. परंतु सततची नापिकी व लाँक डॉऊनमुळे हे कर्ज थकीत मध्ये गेले आहे. आता मला शेतीसाठी पैशाची गरज आहे म्हणून मी पीककर्जासाठी भारतीय स्टेट बँक पाचोड येथे अर्ज केला असून माझे कर्ज महिंद्रा होम फायनान्स चे कर्ज थकीत असल्याने कर्ज नाकारण्यात आले आहे...(अनिस पटेल, शेतकरी,कोळी बोडखा)
मी पाचोड येथील महाराष्ट्र बँकेत पीक कर्जासाठी अर्ज केला होता माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं कर्ज थकीत नसून मी एका मित्राचा जामीनदार असून जामीनदार असल्यामुळे पाचोड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेने मला हे कारण देत कर्ज नाकारले आहे. (आबासाहेब भुमरे, शेतकरी पाचोड)
Leave a comment